बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक केव्हा होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | कालपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. या पावसाळी अधिवेशनातच विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षानं लावून धरली होती. तसेच विरोधी पक्षाकडून देखील विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी होत होती. अशातच आता विधानसभा अध्यक्षांची निवडणूक केव्हा होणार याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा सर्व कार्यक्रम अगोदर राज्यपालांना कळावावा लागतो. यानंतर सर्व सदस्यांना देखील याची माहिती द्यावी लागते. पुढे तारखेची मंजुरी मिळाल्यानंतर ज्या दिवशी  निवडणूक होणार त्याच्या एक दिवस आधी दुपारपर्यंत उमेद्वारी अर्ज मागे घेता येतो. यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान होते.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीच्या या सर्व प्रक्रियेसाठी कमीत कमी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्यपालांना अध्यक्षांच्या निवडणूकीबाबत कळवलं आहे. यामुळे जेव्हा कोरोनाची सर्व परिस्थिती अटोक्यात येईल तेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच काल विधानसभेत जो गदारोळ उडाला त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. काल विधानसभेत जे काही दृश्य पाहायला मिळालं ते खरोखर शरमेने मान खाली जावी असं दृश्य होतं, असं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर कंगनानं उपस्थित केला प्रश्न, म्हणाली…

“माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी”

“काल जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं”

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या नृत्याने चोरलं चाहत्यांचं मन

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More