बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जात पंचायतीचा जाच संपणार कधी?; बहिष्कार टाकल्यानं 7 बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

चंद्रपुर | ‘जात साली जात साली जाता जाता जात नाय’ अवधुत गुप्ते यांचं हे गाणं खुप प्रसिद्ध झालं होतं. जात पंचायतींना समाजातील किड समजलं जातं. जातीच्या आधारावर समाज कधीच एक होऊ शकत नाही. मागील अनेक शतकांपासून देशात सर्वत्र प्रत्येक जातीत जात पंचायत असायची. समाजातील चांगले वाईट निर्णय या जात पंचायती घेत असत. आता देशाला स्वातंत्र्य मिळुन 70 हून अधिक वर्ष झाली तरी आपला समाज काही अजूनही जातीपातीतून स्वतंत्र झालेला दिसत नाही.

जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींवर आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात घडली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना असून यामुळे जातपंचायतीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रकाश ओगले असं 58 वर्षीय मृतकाचं नाव असून रविवारी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मृत्युची माहिती देण्यात आली. जावई आणि इतर लोक त्यांच्या अंतिम विधीसाठी जमा झाली.

मात्र गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने त्यावेळी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. आणि जो त्यांच्या पार्थिवाला खांदा देईल त्याला जात बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी दिल्यामुळे अनेक लोकांनी त्याठिकाणाहून काढता पाय घेतला. जावयांना तसेच इतर लोकांना फोनवरून धमकी देण्यात आली. त्यानंतर प्रकाश ओगले यांच्या 7 मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कुटूंबातील व्यक्तीसोडून इतर कोणीही यावेळी उपस्थित नव्हते, त्यामुळे 7 बहिणींनी एकत्र येत आपल्या वडिलांना खांदा दिला. त्याच सोबत अंत्यविधीचे सर्व कार्यक्रम पार पाडले. समाज हा एकमेकांना आधार देण्यासाठी असतो, एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होण्यासाठी समाज ही परिसंस्था तयार झाली आहे. पण जात पंचायती अस्तित्वामुळे समाजाचे प्रश्न आणखी वाढतात, हे देखील सत्य आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या

कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तींसाठी नियमात बदल

“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा

केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More