बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा शेवट कधी होणार?; आता समोर आली अत्यंत महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं चिंतेत भर पाडली आहे. कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील आकडेवारी तर धडकी भरवणारी आहे.

सगळकीडे थैमान घालणारा कोरोना कधी संपणार असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. कोरोना कधी संपणार यावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. मायकेल रायन यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आपण या विषाणूला आता नष्ट करू शकणार नाही. कारण हा विषाणू आपल्या परिसंस्थेचा भाग बनला आहे. परंतू आपण कोरोनामुळे उद्भवलेली सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपवू शकतो, असं वक्तव्य डॉ. मायकेल रायन यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण कमी करण्यासाठी जगातील सर्व लोकसंख्येला लसीकरण झालं पाहिजे. तरच कोरोना महामारी संपविण्यास मदत मिळेल, असंं मत रायन यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लावावं का?; WHOचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

अभिनेता विकी कौशलचा 13 वर्षापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण

Pushpa: अभिनेता अल्लू अर्जुन स्वतःच्याच आवाजाच्या प्रेमात, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More