Top News राजकारण

राज्यात दिशा कायदा केव्हा लागू होणार?; मनसेचा गृहमंत्र्यांना सवाल

कल्याण | राज्यात दिशा कायदा कधी लागू करणार? असा सवाल मनसेने केलाय. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत विचारणा केली आहे.

राजू पाटील म्हणतात, “25 तारखेला आठगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. बंदी असताना या तरूणांनी रेल्वेत प्रवास कसा केला? असे गुन्हे रोखण्यासाठी दिशा ॲक्ट राज्यात कधी लागू होणार का?”

दरम्यान या 21 वर्षीय तरूणीने प्रतिकार केल्याने ती बचावली. शिवाय प्रसंगावधान राखत तिने आरोपीचे फोटो देखील काढले आहेत. त्या फोटोच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा दाखला देत राजू पाटील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यात दिशा कायदा कधी लागू करणार? असा प्रश्न विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा; नितेश राणेंचा दावा

“विरोधकांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही”

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये आढळले 5 हजारांहून अधिक कोरोनाचे रूग्ण

ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण…- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या