बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?; विजय वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात धुमाकूळ घातला होता. दुसऱ्या लाटेच्यावेळी कोरोना रूग्णसंख्या दररोज 60 हजारांचा आकडा गाठत होती. तर 500 हून अधिक मृत्यु राज्यात होत होते. त्यानंतर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले. लाॅकडाऊनमुळे कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आली. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यावर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या घटली असली तरी खबरदारी घेण्याची गरज आहे. पण ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं निर्बंध शिथील करण्याबबात मंत्रीमंडळात अद्याप एकमत झालं नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात लागू असलेले निर्बंध शिथील करण्यासाठी मंत्रीमंडळात चर्चा झाली असल्याचं देखील वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. देशाच्या 10 राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे, त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

दरम्यान, कोरोना अद्याप संपलेला नाही. व्यापाऱ्यांच्या मागण्या देखील योग्य आहेत. व्यापाऱ्यांच्या भावनाशी सहमत राहून मुख्यमंत्री निर्णय घेतील. परंतु कोरोना बाबतीत ढिलाई महागात पडू शकते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार सावध पाऊल टाकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मंडपात एंट्री घेताच नवरीने केलं असं काही की…’; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

संजय राठोडांशी ‘ती’ तब्बल 90 मिनिटे बोलली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More