बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?, शास्त्रज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाची लाट आटोक्यात आली असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता बनारस हिंदू विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवता येत नसला तरी रुग्णांच्या मृत्यूदरात आपण घट आणण्यात प्रयत्न करु शकतो. मात्र अॅंटीबाॅडीजची पातळी कमी झाली तर तीन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त आहे, असं बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे एजनेटिकिस्ट, प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितलं.

ज्या लोकांनी लसीकरण केलं नाही अशा लोकांना, लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जास्त धोका होऊ शकतो. मात्र ज्या लोकांनी लसीकरण केलं आहे किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे अशी लोक तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत, असंही ज्ञानेश्वर चौबे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लसीकरणामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि त्यामुळे विषाणूंचा प्रतिकार करण्यास मदत होईल.  आपली प्रतिकारशक्ती 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या गटातील लोकांना कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

बिहारच्या राजकारणात खळबळ! ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

लाईव्ह मॅचमध्ये बॅनरला लटकली होती मांजर अन्…; थरारक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

“स्वतःच्या बुडाखाली काय जळतं ते बघा, मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले?”

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More