बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘2024 मध्ये 300 खासदार निवडून येतील असं वाटत नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर

मुंबई | देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) विरोधात नेतृत्व उभे करण्याची तयारी सुरु झालेली आहे. काँग्रेसही (Congress) 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मजबूत बनवण्याच्या तयारीत आहे. मात्र आता काँग्रेसच्याच नेत्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश 300 पेक्षा जास्त जागा मिळतील असं आपल्याला वाटत नसल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजौरी जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये हा दावा केला आहे. कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, आपल्याकडे 300 खासदार कधी असणार? त्यामुळे मी 370 कलम लागू करण्याविषयी आश्वासन देऊ शकत नाही असं ते म्हणाले आहेत. कृष्णा खोऱ्यातील पुंछ जिल्ह्यात एका सभेला ते संबोधित करत होते.

ते पुढे म्हणाले, ‘काहीही झालं तरी त्यासाठी 2024 मध्ये 300 खासदार निवडून येणं गरजेचं आहे. देव करो आणि आपले 300 खासदार निवडून येवोत. पण, सध्याची परिस्थिती पाहता ते होईल असं वाटत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला खोटं आश्वासन देत नाही आणि कलम 370 बद्दल बोलणं टाळतोय, असं आझाद यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कलम 370 लागू करण्याबद्दल बोलताना, ‘काश्मिरला पूर्ण राज्याचा दर्जा देणे आणि लवकर विधानसभा निवडणुक घेणं या आपल्या प्रमुख दोन मागण्या असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा 370 कलम लागू करण्याबद्दल त्यांनी बोलण टाळलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मी देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहे- कंगना रनौत

‘…त्यावेळी मात्र या सरकारला लकवा मारतो’; भाजप नेत्याची बोचरी टीका

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More