बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना दोष देणं कधी थांबवणार?”

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा याला पाॅर्नोग्राफीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. मात्र राजच्या अटकेनंतर अनेकांनी शिल्पाला ट्रोल केलं आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर शिल्पाबाबत अनेक मीम्स देखील बनवण्यात येत आहेत. अशातच बाॅलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हीने शिल्पाला साथ देत एक ट्विट केलं आहे.

रिचाने तिच्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये तिने शिल्पाला साथ देत जे लोक शिल्पावर निशाणा साधत आहेत त्या सर्वांना प्रश्न केला आहे. पुरुषांच्या चुकीसाठी महिलेला दोष देणं कधी थांबवणार?, असा सवाल करत हा जणू आपला राष्ट्रीय खेळ बनला असल्याचं रिचाने म्हटलं आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील काल शिल्पाला साथ देत एक ट्विट केलं होतं. यामध्ये आनंदाचा सोहळा असला की सेलिब्रेटिंचा गोतावळा जमा होता. मात्र दुःखात एकही जण समोर येत नाही, असं हंसल यांनी लिहिलं होतं. मोठमोठे सिलेब्रिटी शिल्पाचे मित्र आहेत. मात्र राजला अटक केल्यानंतर सर्वांनी चुप्पी साधली आहे.

दरम्यान, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला 15 जुलै रोजी पाॅर्नोग्राफीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत रोज नवीन खुलासे होत असून शिल्पा शेट्टी देखील यामध्ये शामील आहे की नाही याचा तपास पोलीस करत आहे. अद्याप शिल्पाविरुद्ध पोलिसांना कसलाही पुरावा सापडला नाही. मात्र शिल्पाला देखील क्लिन चिट मिळाली नाही.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

‘या’ नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि जाणून घ्या आपल्या पीएफ खात्यातील रक्कम

‘मुंबई पोलिसांनी माझ्याकडे…’; गहना वशिष्ठचा खळबळजनक आरोप

“ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, आता ते कलेक्शन ऑफिस झालंय”

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More