बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनोहर मामाला पोलिसांनी कुठं आणि कसं पकडलं?, मोठी माहिती समोर

पुणे | संत बाळू मामा यांचा अवतार असल्याचं सांगत लोकांची फसवणुक करणारा भोंदू मनोहर मामा भोसलेला अटक झाली आहे. मनोहर मामाने अनेकांना गंडा घातला आहे. त्याला अटक झाल्यावर एक-एक प्रकरण बाहेर येऊ लागलं आहे. पोलिसांनी नेमकं कुठं आणि कसं पकडलं याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

शशिकांत खरात या तरूणाने मनोहर भोसलेविरोधात तक्रार दाखल केली होती. माझ्या वडिलांच्या गळ्यातील थायरॉईड-कॅन्सर बरा करतो असं मनोहर मामा आणि  विशाल वाघमारे, ओमकार शिंदे यांच्याविरोधात आर्थिक फसवणुक केली असल्याचा आरोप केला आहे. एकूण 2 लाख 51 हजार रूपयांना गंडा घातल्याचं शशिकांत खरातने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

अनेक गुन्हे नावावर असलेल्या मनोहरच्या मागावर पोलिसही होतेच. पोलिसांनी आपली सुत्र हलवलीत त्यांना मनोहर भोसलेच्या ठिकाण्याची माहिती मिळाली. मनोहर भोसले सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यात सालपे गावात एका फार्महाऊसवर होता.

दरम्यान, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढमाळ, सपोनि संदीप येळे, पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननावरे, पो.हवा. विजय कांचन, अजय घुले, राजु मोमीन, धीरज जाधव यांच्या पथकाने धाड टाकत मोठ्या शिथापीने मनोहर भोसलेला अटक केली. त्याच्या अटकेनंतर अनेक उद्योग बाहेर येऊ लागले आहेत.

थोडक्यात बातम्या-

बाबो! रिलेशनमध्ये येताना महिलेनं 17 पानी काॅन्ट्रॅक्ट लेटर करत केल्या ‘या’ रोमँटिक मागण्या!

…म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण!

साकीनाकाच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले…

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह

‘या घटनेवर राजकारण करणं म्हणजे मृत्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’; संजय राऊत विरोधकांवर संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More