बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना व्हायरस कुठून आला?, शास्त्रज्ञांना सापडला मोठा पुरावा

बीजिंग | कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. या व्हायरसने लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजुनही भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने परिस्थिती गंभीर आहे. कोरोना ही चीनमधून आल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. कोरोना व्हायसर चीनच्या लॅबमध्ये करण्यात आला असंही बोललं जातं. मात्र अशातच ब्रिटिश आणि नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरस चीनमधून आल्याचा दावा करत मोठा पुरावाही सादर केला आहे.

ब्रिटिश प्राध्यापक एंगस डल्गलिश आणि नॉर्वेतील शास्त्रज्ञ डॉ. सोरेनसन यांनी कोरोनाव्हायरस चाीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आला असा दावा केला आहे. कोरोनाव्हायरसच्या सॅम्पलमध्ये युनिक फिंगरप्रिंट मिळाले आहेत, जे लॅबमध्ये व्हायरसशी छेडछाड केल्यानंतरच शक्य असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. डेली मेलने याबाबत वृत्त दिलं असून शास्त्रज्ञांनी आपला रिपोर्ट दिला आहे.

चिनी शास्त्रज्ञांनी व्हायरसला वुहान लॅबमध्ये गेन ऑफ फंक्शन प्रोजेक्टवर काम करत बनवलं आहे. गेन ऑफ फंक्शन अमेरिकेत अस्थायी स्वरूपात बॅन आहे. यामध्ये नैसर्गिक निर्मित व्हायरसला अधिक संसर्गजन्य बनवण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची निर्मिती केली जाते. जेणेकरून माणसांवर त्याचा जास्त परिणाम होईल, असं रिपोर्टमध्ये दिलेल्या संशोधनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आम्हाला वाटतं रेट्रो इंजिनीअरिंगमुळे व्हायरस तयार करण्यात आला होता. त्यानंतर त्याला बदलण्यात आलं आणि त्याला असं सिक्वेंस देण्यात आलं, जे कित्येक वर्षांपूर्वीच्या स्थितती होता. वुहान लॅबमधील पुरावे नष्ट केल्याबाबत शास्त्रज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या शास्त्रज्ञांना याची माहिती द्यायची होती ते गायब झाले किंवा आतापर्यंत काही बोललं नसल्याचं प्रा. एंगस डल्गलिश यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

क्लार्कच्या घरावर पडला छापा, संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

कोरोनामुळे आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षणासह केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा!

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

संभाजीराजेंसोबतच्या भेटीत प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य

वर्षभराचा चारा जळून खाक, कृषी पदवीधर युवाशक्तीचा शेतकऱ्याला मदतीचा हात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More