मुंबई | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करतंय असा आरोप सतत केला जात होता. त्यातच आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी यामध्ये भर म्हणून आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्र्यांनी तपास यंत्रणांच्या धाडीला प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं आहे.
“2014 ला सत्तेत येण्यापुर्वी भाजपने डोक्यावर सिलेंडर घेऊन ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, म्हणत आंदोलनं केली होती. पण आता ‘कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा’, असं म्हणण्याची वेळ आली आहे”, असं प्रतिपादन भास्कर जाधव यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरूद्ध शिवसेना असा वाद पेटताना पाहायला मिळत आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील कारवाई आणि ज्या पद्धतीने त्या मागे लागल्या आहेत, ते अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत त्यांनी आता या दडपशाही विरोधात बोलण्याची गरज असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनाही टोला लगावला आहे.
‘कोणतीही घटना असो, छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर दरेकर प्रतिक्रीया व्यक्त करण्यासाठी उपलब्ध असतात, एकतर ते स्टुडीओत असतात किंवा मीडियाचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात’, असा टोला लगावत त्यांनी प्रविण दरेकरांवरही निशाणा साधला आहे.
थोडक्यात बातम्या –
ठाकरे सरकारमुळेच कोरोना आटोक्यात, सामनाच्या अग्रलेखातुन संजय राऊतांचा हल्लाबोल
सकाळी-सकाळीच किरीट सोमय्यांच्या ट्विटने उडवली खळबळ, आज दुपारी करणार…
मोठी बातमी! नागपुरात निर्माणाधीन पुल कोसळला; अख्ख कुटूंब थोडक्यात बचावलं!
कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मोठा निर्णय; राजकारणात नवं समीकरण दिसणार?
राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी
Comments are closed.