बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विरोधी पक्ष नक्की कोठे आहे?, पवारांनी फक्त आस्वाद घेण्याचं काम केलं”

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीची ही बैठक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. विविध नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास ही बैठक  झाली. या बैठकीत केंद्र सरकारविरूद्ध चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आता यावर शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून टीका केली आहे.

‘राष्ट्रमंच’ जेवढा गाजला तेवढे त्याच्या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, परंतु ते सोडविण्याचे व्हिजन सरकारकडे नाही. भाजपातून बाहेर पडल्यावर सिन्हा यांनी ‘राष्ट्रमंच’ स्थापन केला व त्यात समविचारी लोकांना एकत्र केले. भाजप विरोध किंवा मोदी विरोध हाच एकमेव समविचार असल्याने काही लोक त्यात सामील झाले. सरकारला ते व्हिजन वगैरे देण्याचे काम राष्ट्रमंच करणार असल्याचं सांगण्यात आलं. मुळात ‘राष्ट्रमंच’ नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे व त्याची स्थापना यशवंत सिन्हा यांनी करून ठेवली आहे, हे या निमित्ताने उघड झाले, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

बैठकीत राजकीय चर्चेबरोबरच कोरोना संकट, वाढती महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांवर विचारमंथन झाले. म्हणजे नक्की काय झाले? पवारांच्या ‘6 जनपथ’वर हे जे लोक जमले ते राजकीय कृतीपेक्षा विचार मंथनावर भर देणारे होते. पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट व आपली काय ती विचारमंथनांची घुसळण असा फक्कडसा बेत दिल्लीत झाला. त्याचा फक्त आस्वाद घेण्याचं काम पवार यांनी केलं, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

विस्कळीत पडलेल्या विरोधी पक्षाचा अवतार पाहून ‘युपीए’ नावाची संघटना आहे, पण देशात प्रबळ, संघटित विरोधी पक्ष आहे काय? हा प्रश्न लटकूनच पडला आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचचे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच. निदान त्यासाठी तरी ‘राष्ट्रमंच’वाल्यांचे आभार मानायला हरकत नाही, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, असे धंदे मी करत नाही- जितेंद्र आव्हाड

मंत्री बच्चू कडूंनी वेशांतर करुन टाकलेल्या धाडीमुळे धक्कादायक माहिती समोर!

भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव

मोठी बातमी! डेल्टा प्लस कोरोनानं घेतला पहिला बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More