बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाई पॅन्ट कुठे आहे?’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल

मुंबई | नेटफ्लिक्सवर झळकणारी भारतीय अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या एका फोटोमुळे प्रचंड ट्रोल होत आहे. राधिका ही बाॅलिवूडची बोल्ड अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. एवढंच नाही तर ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते.

राधिकाने नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिच्या शेजारी एका बेडकाचा छोटा पुतळा आहे. बेडकाने दिलेली पोझ राधिका आपटेने दिली आहे. अनेकांना हा फोटो प्रचंड पसंतीस आला तर अनेकांनी यामध्ये राधिकाची पॅन्ट दिसत नसल्याने तिला ट्रोल केलं आहे.

राधिकाच्या बेडूक पोज मधील फोटोवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दाखवलं आहे. तिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. तर अनेकांनी भीक मागत आहेस का?, एकाने बाई तुझी पॅन्ट कुठे गेली?, अशा खोचक प्रश्न तिला ट्रोल करत तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

दरम्यान, अनेक अभिनेत्री तसेच अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मोठ मोठ्या अभिनेत्रींना देखील अनेक वेळा ट्रोल करण्यात आलं आहे. अशावेळी अनेक कलाकार या ट्रोलिंगला उत्तर देतात. तर काही गप्पपणे सोडून देतात. अशाचप्रकारे आता राधिका तिच्या ट्रोलर्सना उत्तर देईल का हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.

पाहा कमेंट:

थोडक्यात बातम्या-

“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”

“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”

…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’

पूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…

मोठी बातमी! राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More