बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंह कुठे गायब आहेत?, ‘या’ नेत्याने दिलं उत्तर

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूली केल्याचे आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले होते. अनेक दिवसांपासून परमबीर सिंह गायब असल्याचं वृत्त आहे. परमबीर सिंह कुठे आहेत?, असा प्रश्न राज्यशासनासह पोलिसांनाही पडला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी दिलं आहे.

संजय निरूपम यांनी परमबीर सिंह यांच्यासंदर्भात ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. संजय निरूपम यांनी ट्विटमध्ये परमबीर सिंह यांचा एक फोटो शेअर केला आहे. संजय निरूपम यांनी म्हटलं आहे की, हे आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त. ते स्वत: पाच गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आहेत आणि फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  आता अशी माहिती आहे की, परमबीर सिंह बेल्जियममध्ये आहेत, असा दावा संजय निरूपम  यांनी केला आहे.

संजय निरूपम यांनी ट्विटमध्ये परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले?, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांना बेल्जियममध्ये जाण्यास सुरक्षित रस्ता कुणी दिला. तसेच गुप्तहेर पाठवुन आपण त्यांना परत आणु शकत नाही का?, असा प्रश्नही संजय निरूपम यांनी विचारला आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबईसोबतच ठाण्यातही अनेक ठिकाणी खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. परंतु. अजुनही परमबीर सिंह यांचा शोध लागला नाही.

थोडक्यात बातम्या- 

“त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी 3 जावयांचे दिवाळीत एकदमच बॉम्ब फोडणार”

एमआयएममध्ये फूट?, ‘त्या’ व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ

“पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या…”

तालिबान्यांचा क्रुरपणा! लग्नात संगीत लावल्यामुळे 13 अफगाण लोकांची हत्या

‘ते’ आंदोलन भोवलं; पडळकरांसह 70 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More