बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

मुंबई | राम मंदिराच्या जमीन खरेदीवरून घोटाळा झाल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. मात्र यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेमध्ये खडाजंगी चालू आहे. मुंबईत आज शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपवरून शिवसेनेनं भाजपवर केलेल्या टीकेमुळे भाजप संतापली आहे. त्यानंतर आता या दोन्ही पक्षात राजकीय वाकयुद्धाला सुरवात झाली आहे.

महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेेंची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे? आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदिराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई शिवसेनेनं सत्व गमावले आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

सेना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भांडणानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भाजपच्या 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर असलेल्या आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं पण दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान, येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या चष्मातून ही भांडणं बघतली जात आहे. त्यामुळे यंदाची मुंबई महापालिका निवडणूक चांगलीचं रंगणार असं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

‘कोरोनाच्या संकटातही मैदानात उतरण्यासाठी आतूर’; फिक्सिंगमध्ये सापडलेल्या ‘या’ खेळाडूवरील बंदी बीसीसीआयने हटवली

मन पिळवटून टाकणारी घटना! 15 दिवस फक्त पाणी पिऊन काढले दिवस

नियतीचा क्रुर डाव! माय-लेकीचा कोरोनाने केला घात, दोघींचा एकाचवेळी दशक्रिया विधी 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More