“वाल्मिक कराड कुठं आहेत? पत्ता देतो…”; धनंजय मुंडे काय म्हणाले?

Dhananjay Munde

Dhananjay Munde l अवघ्या राज्याला हादरून टाकणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच या घटनेप्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षाने टार्गेट केलं आहे. कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे जवळचे निकटवर्तीय आहेत. अशातच आता अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड हे 4 दिवसांपासून नागपुरातील फॉर्म हाऊसवर असल्याचा गौप्यस्फोट विधानपरिषदेत केला आहे. दरम्यान, दानवेंच्या या आरोपावर आमदार धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिल आहे.

हत्येप्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे :

याप्रकरणी धनंजय मुडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केल आहे. त्यामुळे सर्वांचे समाधान झाले आहे. त्यामुळे विधानभवनाच्या सदनात माझ्या नावावर जे आरोप करण्यात आले आहेत त्याचा तपास पोलीस नक्कीच करणार आहेत. याशिवाय आता पोलीस यंत्रणेने हा तपास सीआयडीकडे दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते काय बोलत आहेत हे मला सांगता येत नाही.

याशिवाय वाल्मिक कराड हे नागपुरात कुठे आहे ते देखील अंबादास दानवे यांनी सांगावे. त्यानंतर पोलिसांनी देखील त्यांना पकडण्याचे काम केलं असतं. मात्र या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अशा पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे, ही माझी भूमिका असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

Dhananjay Munde l या हत्येचं समर्थन कोणीच करु शकत नाही :

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर धनंजय मुंडे यांनी देखील भाष्य केलं आहे. संतोष देशमुखांची ज्या प्रकारे हत्या झाली आहे त्याचं समर्थन देखील कोणीच करु शकत नाही. त्यामुळे जवळपास सर्व आरोपींना अटक सुद्धा केली आहे.

तसेच आता या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी एसआयटी आणि सीआयडी देखील नेमली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास होणार आहे. तसेच आता या प्रकरणावरून धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत.

News Title – Where is Valmik Karad? Answered by Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्त्वाची व्यक्ती जेरबंद!

धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं; ‘या’ कारणामुळे मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?

ग्राहकांसाठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, किती रुपयांनी घसरले भाव?

तुम्ही रॉयल्टी चोरी करता, तोंड काळ का केलं? भाजपच्या ‘या’ नेत्याचा खडसेंना सवाल

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट?, मोठा खुलासा समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .