मुंबई | अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे सोशल मीडियावर नेहमी नवनविन पोस्ट टाकत प्रेक्षकांची मने जिंकत असतात. नुकताच त्यांनी आपल्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत पोस्टद्वारे सर्वांना एक खास संदेश दिला आहे.
मुलांना ट्रिपला थंड हवेच्या ठिकाणी जरुर न्या पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं ‘गरम रक्त’ सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा, असं प्रविण तरडेंनी म्हटलं आहे.
प्रविण तरडेंनी त्यांच्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी पालकांना आपल्या मुलांना फिरायला घेऊन जा पण अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महारांजांच्या किल्ल्यांवरही घेऊन जायला सांगितलं आहे.
दरम्यान, प्रविण तरडेंच्या या पोस्टचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आणि त्याच्या या पोस्टला भरपूर लाईक्स मिळाले असून ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मराठ्यांसह ‘यांनाही’ आरक्षण द्या’; रामदास आठवलेंची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड!
‘राज्यपालांनी आता अंत पाहू नये’; अजित पवार संतापले
रिहानाचा ख्रिस गेलसोबतचा ड्रेसिंगरूममधील व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ