बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत

जळगाव | गेल्या काही दिवसांमध्ये कोळशाच्या कमरतेमुळे देशावर आणि राज्यात वीज संकट घोंगावत होते. राज्यातील काही भागांमध्ये भारनियमन देखील करण्यात आले होते. मात्र, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भारनियमावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. राज्यात भारनियमाच्या नुसत्या वावड्या उठवण्यात येत आहे, असं नितिन राऊत म्हणाले आहेत.

राज्यात विविध ठिकाणी वीज भारनियमाबाबत अनेक संभ्रम आहेत. राज्यात कुठेच गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून भारनियमन नाही. राज्यात सध्या कुठेच भारनियमन नाही आणि यापुढेही होणार नाही, असं ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे. तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे वीजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे, असं नितीन राऊतांनी म्हटलं आहे.

ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्रित येऊन काम केल्यामुळे गेल्या 22 दिवसांमध्ये कोणतेही भारनियमन झालेले नाही. महावितरण ही वीजवितरणासोबत रात्र अन् दिवस सेवा देणार कंपनी आहे, असं नितीन राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोना काळ, अतिवृष्टी आणि महापुरामध्येही राज्यामध्ये अखंडीत वीजपुरवठा देण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली होती. वीज पुरवठा करणे हे महावितरणाचे कार्य असल्याने ग्राहकांनी आपली वीज देयके वेळेत भरून कंपनीला  वीज कापण्याची संधी देऊ नये, असं ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांना…’; संजय राऊतांचा इशारा

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

“लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात आहे”

“मी माणसांच्या जंगलातले 2 खरे वाघ पाहिलेत, एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे…”

रशियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा; पुतिन यांचा ‘या’ देशाला गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More