बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनी म्हणतो,”मी पुन्हा येईल…, मी कुठं आयपीएल सोडलंय”

मुंबई | आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली आहे. शुक्रवारी 15 ऑक्टोबरला आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता संघाचा 27 धावांनी पराभव केला. अंतिम सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काही प्रश्नांची उत्तरे दिली. माजी क्रिकेटर आणि समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला आपण ऐतिहासिक वारसा पाठीमागे सोडून चालला आहात, असं म्हटलं होतं. त्यावर मी अजून कुठे सोडलयं, असं प्रत्युत्तर महेंद्रसिंग धोनीने दिलं आहे.

हर्षा भोगले यांनी म्हटले होते की, आपण इतक्या दिवसांपासून अतिशय चांगलं काम केलं आहे. क्रिकेटच्या इतिहासात एक वारसा सोडून चालला आहात. महेंद्रासिंग धोनीने उत्तरादाखल तात्काळ म्हटलं की, मी अजून सोडलेलं नाही. त्यामुळे भविष्यात 2022 सालच्या आयपीएल हंगामात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी राहण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना महेंद्रसिंग धोनीेने चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘मी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. आम्ही ज्या ज्या ठिकाणी खेळलो, अगदी दक्षिण आफ्रिकेतही चेन्नई संघाचे मोठ्या प्रमाणात चाहते होते, असं महेंद्रासिंग धोनीने म्हटलं आहे. तसेच सामन्याची आपण आतुरतेने वाट पहात असता. चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व चाहत्यांची भावना असते की,  ते स्वत: चेन्नई संघात खेळत आहेत. मला आशा आहे की, सर्व चाहत्यांसाठी मी चेन्नई संघात पुन्हा येईल, असंही महेंद्रसिंग धोनीने म्हटलं आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीे पुढे म्हणाला की, मी किती दिवस खेळणार हे बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून आहे. पुढील वर्षी आयपीएलमध्ये दोन नविन संघाचं पदार्पण होणार आहे. त्यामुळे आम्हाला चेन्नई सुपर किंग्जसाठी काय चांगलं आहे हे ठरवावं लागेल. तसेच एक मजबूत संघ बनवण्यसाठी प्रयत्न करणार असल्याचं महेंद्रसिंग धोनीने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का?’, शरद पवार म्हणतात…

“राज ठाकरे आणि नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर का पडावं लागलं?”

”मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने…’; शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

‘राज कुंद्राने माझ्याकडून अंगप्रदर्शन करून घेतलं आणि…’; शार्लिन चौप्राचा गंभीर आरोप

‘…म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More