बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजप युती करणारच नाही”

मुंबई | नाशिक दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती. त्यानंतर युतीच्या चर्चा तुफान रंगताना दिसत होत्या. युतीविषयी बोलताना राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी देखील मनसे भाजप युतीवर सकारात्मक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी युती होणार नसल्याचं म्हटलं आहे.

मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भाजपने दिलं. आता ठाकरे सरकार हस्तांतराचा ठराव मंजूर करून टक्केवारी घेत आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला, त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली. मनसे असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्याशी भाजप युती करणार नाही, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.

परप्रांतियांवर अतिक्रमण करू नये हीच माझी भूमिका आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे निर्णय पटले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. जे मला पटलं नाही, त्यावर मी टीका केली. स्पष्ट बोलण्यात चुकीचं काय आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मनसे भाजप युतीच्या आशा मावळल्या होत्या.

दरम्यान, ‘मुझे आम से मतलब है, किससे मीली क्या मतलब’, असं सुचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. तर राज ठाकरे माझे आवडते व्यक्तीमत्व आहे, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ते राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता मनसे काय भूमिका घेणार यावर सर्वांच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर

मोठी बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत पुन्हा बदल

बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती

कौतुकास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली आयएसएस, देशात मिळवली 12वी रॅंक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More