बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही- महादेव जानकर

मुंबई | एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, असा घरचा आहेर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपला दिला आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मानखुर्द येथे प्रचंड चक्काजाम आंदोलन केलं. शेकडो कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जानकर बोलत होते.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना निधी मिळाला पाहिजे. तसेच ओबीसींना त्यांची आर्थिक आणि सामाजिक भागीदारी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं जानकर म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा जानकर यांनी दिला.

वरिष्ठ पोलिसांनी जानकरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तर अर्ध्या तासानंतर आंदोलन मागे घेतो. शांततेत आंदोलन करत आहोत. कुणालाही त्रास द्यायचा नाही, आम्हाला फक्त आमचं म्हणणं मांडायचं आहे, असं जानकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

चिंताजनक! रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ‘इतकी’ मुलं कोरोनाच्या विळख्यात

ह्रदयद्रावक! 12 दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ…’; राऊतांचं सूचक ट्विट

इन्स्टा रिच लिस्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव!

नवरदेवासाठी त्याचे मित्रच ठरले लग्नातील विघ्न; रिकाम्या हाती परतला नवरदेव

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More