बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र ‘मास्क फ्री’ होणार का?, ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जगामध्ये कोरोना साथीने हाहाकार माजवला आहे. कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी मास्क घालण्याची सक्ती करण्यात येत आहे. सामाजिक अंतर पाळण्याचा वारंवार सांगण्यात येत होते. मास्कचा वापर न केल्यास दंडाची कारवाई करण्यात येते.  मात्र, आता मास्कमुक्त होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

जगातील काही देशांनी मास्कवरील बंधन हटवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीमध्ये मास्कबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये  मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची बंदी नसल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यभरात आतापर्यंत 14 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 6 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे मास्कबाबत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. मात्र, काही दिवसांनी कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने तिथे मास्क वरील बंदी उठवण्यात आली आहे.

दरम्यान, इस्त्राईल हा देश जगातील पहिला मास्कवरील बंदी हटवणारा देश आहे.  इस्त्राईलमध्ये 70 टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्ये 12 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी मास्क परिधान करावे, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामध्ये वाढ झाल्याने मार्गदर्शक सुचनेमध्ये बदल केले होते.

थोडक्यात बातम्या- 

लस घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मेडिकलमध्येही मिळणार ‘या’ दोन लस

काँग्रेसला मोठं भगदाड! तब्बल 28 नगरसेवकांचा अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे’; श्वेता तिवारीच्या वक्तव्यानं खळबळ

“बिग बॉसमुळे माझे आयुष्य खराब झाले, माझे करिअर संपविण्याचीही धमकी मिळाली”

लाखो जणांच्या दिलाची धडकन असणारी अभिनेत्री मौनी राॅय अखेर अडकली लग्नबंधनात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More