बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मर्दासारखं लढत राहायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येत सत्तेच्या पायऱ्या चढणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांना भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय, असा आरोप केला होता. त्यावर आता शिवसेनेनं अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसैनिकांना पक्षीय धडे गिरवले आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्वयाप सुरू झाले आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की, हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे. याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा, असा सल्ला या अग्रलेखाच्या माध्यमातून दिला आहे. बरे-वाईट दिवस येतच असतात. वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते, असा टोलाही या अग्रलेखातून लगावला आहे.

मोगलांपुढे शिवरायांनी जुळवून घेतले असते तर दऱ्याखोऱ्यांत भटकून लढाया करण्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले नसते. मोगल बादशहाने त्यांना एखादी मनसबदारी बहाल केली असती व इतर राजांप्रमाणे शिवरायांना त्यावर पिढ्यानपिढ्या गुजराण करता आली असती; पण शिवरायांनी तसे केले असते तर इतिहासपुरुष, महान योद्धा, स्वाभिमान, अभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आपण आज जसे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, तसे झालो नसतो, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण यात दिलं आहे.

दरम्यान, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणून, आजची शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे ‘बळ’ आहे, असे धडे शिवसेनेने शिवसैनिकांना गिरवले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भाजपचा एकही आमदार फुटला नाही, म्हणूनच दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न”

15 पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत भाजपविरोधी आघाडीसाठी शरद पवार आज घेणार महत्वाची बैठक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपण्यास राज्यसरकार सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना

मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही, म्हणून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा गृहविभागाला ई- मेल अन्…

शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More