बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनावर सर्वात चांगलं औषध कोणतं?, मोठी माहिती आली समोर

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारीचं सावट अद्याप काही संपायचं नाव घेईना. यातच कोरोनाच्या नवनीन व्हेरियंटनं भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना यामुळे तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहेत.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच कोरोनाची बाधा झाल्यावर कोणती औषधं घ्यावी, याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत.

सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या उपचारांमध्ये, बॅरिसिटिनिब, रुक्सोलिटिनिब, सोट्रोविमाब, कॅसिरिविमाब-इमडेविमाब, टोसिलिझुमॅब किंवा सरिलुमॅब सारखी औषधं कोरोनाबाधित रूग्णाला दिली जाऊ शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या सर्व औषधांमुळे व्हायरसची तीव्रता कमी होत असल्याचा दावा डब्ल्यूएचओने केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वात काही औषधांचा वापर न करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

बोलण्याची संधी दिली नाही म्हणून महिलेनं केलं ‘हे’ कृत्य, पाहा व्हायरल व्हिडीओ

लसीकरणासाठी हमरीतुमरी; व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

पुणे पोलिसांना मोठं यश! अखेर 9 दिवसांनी अपहरण झालेला ‘तो’ चिमुरडा सापडला

प्रेमासाठी काहीपण! तरुणानं प्रेयसीच्या आईला स्वतःची किडणी केली दान, अन् नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

रागाच्या भरात महिलेनं ऑनलाईन विकला पती, ‘या’ सवयीमुळे होती त्रस्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More