Earthen Pots Benefits in Summer l उन्हाळ्यात बरेच लोक मडक्यातील पाणी पिण्यास प्राधान्य देतात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या लाल, काळ्या आणि पांढऱ्या मडक्यांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे, याबद्दल अनेकजण संभ्रमात असतात. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात कोणत्या प्रकारच्या मडक्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
उन्हाळ्यात मडक्यातील पाणी का चांगले? :
उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. रेफ्रिजरेटरचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असू शकते, त्यामुळे अनेक लोक नैसर्गिकरीत्या थंड राहणाऱ्या मडक्यातील पाणी पिण्यास पसंती देतात. मडक्याच्या वापरामुळे पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते आणि त्यामध्ये उपस्थित सूक्ष्म घटक शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
Earthen Pots Benefits in Summer l काळा, लाल आणि पांढरा मडका – कोणता उत्तम? :
1. काळा मडका:
– काळ्या मडक्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा रंग उष्णता वेगाने शोषून घेतो आणि त्यामुळे त्यातील पाणी लवकर थंड होते.
– उन्हाळ्यात अधिक गरम तापमानात हा मडका प्रभावी ठरतो.
– शरीरासाठी हा विशेष फायदेशीर असल्याने काळ्या मडक्याला मोठी मागणी असते.
2. लाल मडका:
– पारंपरिकरित्या सर्वाधिक वापरला जाणारा मडका.
– यामध्ये पाणी थोड्या संथ गतीने थंड होते, पण पिण्यास अत्यंत चवदार आणि शुद्ध असते.
– हा मडका बाजारात सहज उपलब्ध होतो आणि तो शरीरास कोणतेही दुष्परिणाम करत नाही.
3. पांढरा मडका:
– हा तुलनेने कमी लोकप्रिय असला तरी अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.
– यामध्ये पाणी चांगले राहते, परंतु तो बनवताना सिमेंट मिसळलेली भांडीही आढळतात, त्यामुळे खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
– सिमेंटयुक्त भांडी टाळणे गरजेचे आहे, कारण त्यातील घटक पाण्यास हानिकारक ठरू शकतात.
सिमेंट मिसळलेले मडके कसे ओळखावे? :
– खऱ्या मातीच्या भांड्यांचे वजन हलके असते, तर सिमेंटयुक्त भांडी तुलनेने जड असतात.
– सिमेंट मिसळलेली भांडी गुळगुळीत आणि चमकदार दिसतात.
– या भांड्यांमधील पाणी मातीच्या मडक्यासारखे थंड राहत नाही आणि त्याची चवही वेगळी असते.
उन्हाळ्यात मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे :
– नैसर्गिकरीत्या थंड राहते आणि आरोग्यासाठी सुरक्षित असते.
– शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
– पचनसंस्थेसाठी फायदेशीर आणि अपचन टाळण्यास मदत होते.
– प्लास्टिक आणि स्टीलच्या बाटल्यांपेक्षा अधिक शुद्ध आणि आरोग्यदायी.