बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार टक्केवारीच्या फुगड्या खेळतंय का?”

मुंबई | सध्या चालू असलेल्या पदभरतीवरुन चांगलाच गोंधळ उडालेला आहे. अशातच 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षा 12 तास आदी रद्द झाल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी संताप व्यक्त करत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

पदभरती आणि नियुक्तांवरुन प्रशासन आणि सरकारमध्ये काहीच ताळमेळ नसल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. तसेच हे एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेत का?, असा खोचक सवाल देखील पडळकरांनी केला आहे.

पडळकरांनी आघाडी सरकारकडे अनेक विभागांसाठी 11,351 पदे रिक्त असून सुद्धा राज्य सरकारने MPSCकडे केवळ 4,264 पदांची मागणी केली असल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारवर निशाणा साधताना स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार बनवण्या पुरते यांच्याकडे पदे आहेत. दुसऱ्यांच्या मुलांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात अशी सरकारची मानसिकता असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील ‘या’ भागाला मोठा दिलासा, बहुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजन संपन्न

UPSC Result | लातूरच्या पूजा कदमने अंधत्वावर मात करत युपीएससीत मिळवलं यश

मुंबई विमानतळावर ‘इतके’ हजार प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More