बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोपीला अटक करुन नेताना नातेवाईकांकडून पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

पुणे | इंदापूर जवळील सुगाव येथून एका आरोपीला पोलीस गाडीतून घेऊन जात असताना धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीच्या नातेवाईकांनी गाडीचा पाठलाग करून वाहनाला धडक देेेत पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. या दरम्यान 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

संबंधित आरोपीचं नाव अमोल सावंत असं आहे. अमोल याने तीन महिन्यांपुर्वी सोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकला होता आणि त्यानंतर तो तेथून फरार झाला. खबऱ्यामार्फत पोलिसांनी त्याला अखेर शोधून काढलं. यानंतर पोलिसांनी अमोल याला सुगाव येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

आरोपीला अटक करुन टेंभुर्णी पोलीस अमोलला इंदापूरला आणत असताना अमोलच्या नातोवाईकांनी पोलिसांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. एवढंच नाही तर चार ते पाच वेळा धडक देऊन पोलिसांचं वाहन चक्का-चूर केलं. त्यानंतर आरोपींनी आणि नातेवाईकांनी मिळून पोलिसांना मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्लॅनममध्ये सहभागी असणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला न्यायालयात हाजीर केले असता त्याला 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

सोशल मीडियावर मुलगा बनून तरुणीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, सेक्स टाॅयने ठेवले शारीरिक संबंध

आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आजीने उघडले डोळे अन्…

कोरोनानंतर होणारा ‘म्युकरमायकोसिस’ आजार नेमका आहे तरी काय? वाचा संपुर्ण माहिती

शरीरसंबंध ठेवताना फोटो काढले अन्… पुण्यातील घटनेनं खळबळ

उत्तर प्रदेशच्या जमावाकडून पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला; गाडीची तोडफोड

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More