बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसवलं”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचे नारे दिले जात आहेत. तसेच पुढे जाऊन राज्याचा पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण त्यांनी व्यक्त केला आहे. त्याच्या या वक्तव्यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलग 15 वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारला घरी बसवलं होतं आणि फडणवीसांचं राज्य आलं होतं. जर पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा करायचा असेल, तर पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाची बांधणी नव्या जोमाने करावी लगाणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नाना पटोले हे स्वबळाची भाषा करतच असतात. त्यांना पृथ्वीराजबाबांची साथ मिळाली आहे. या भक्कम युतीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होणार असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असंही शिवसेनेने अग्रलेखात म्हटलं आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची भाषा जोरात केलीच आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत आहे, तरीही स्वबळाची भाषा करतोय. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळापेक्षा आज कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं. इतर सगळे स्वबळाचे शड्डू ठोकत असताना शिवसेना गप्प बसणार का?, असा इशारा सेनेनं दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचं हेच आपलं लक्ष्य”

काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार

“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More