बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले…

नवी दिल्ली | देशातील प्रमुख राज्यांमधील मुख्यमंत्री बदलण्याचा सपाटा सुरू आहे. मागील आठवड्यात भाजपने गुजरातमधील मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री बदलले आहेत. त्यातच आता काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये रविवारी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांनी रविवारी शपथ घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील नवीन नेतृत्वबदलावर शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, आम्ही पंजाब सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असून पंजाबमधील नागरिकांच्या भल्यासाठी काम करणार असल्याचं, पंतप्रधान मोदींनी चरणजित सिंग चन्नी यांना शुभेच्छा देताना म्हणाले आहेत.

रविवारी काँग्रेस हायकंमाडच्या बैठकीत चरणजित सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. चरणजित सिंग चन्नी हे पंजाब राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सुनिल जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांच्यासह नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाची चर्चा सुरू होती. सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव आघाडीवर होतं, पण या सर्वांना डावलत चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली.

दरम्यान, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री पदाची चरणजित सिंग चन्नी यांना शपथ दिली. चन्नी यांच्या व्यतिरिक्त सुखजिंदरसिंग रंधावा यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी उपस्थित होते.

 

थोडक्यात बातम्या –

“किरीट सोमय्यांचं नाट्य म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान”

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

किरीट सोमय्या ईडीचे प्रमुख आहेत का?- सुप्रिया सुळे

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More