बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेच्या पाठीचा कणा मोडला, आता भारतातील…; अल-कायदा संघटनेनं तालिबान्यांना चिथवलं

काबूल | अमेरिकेने अफगाणिस्तानमधील सैन्य काढून घेतल्यानंतर आता त्या ठिकाणी पूर्णपणे तालिबानचा ताबा आहे. तब्बल 20 वर्षानंतर अमेरिकन लष्कराने आपले सैनिक माघारी बोलवले आहेत. त्यामुळे तालिबानने हवेत गोळीबार करत आनंद साजरा केला. याच पार्श्वभूमीवर अल-कायदा या दहशवादी संघटनेने तालिबानचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर भारताबाबत देखील महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये अल्लाहने मिळवून दिलेल्या विजयाबद्दल इस्लामिक जगताचं अभिनंदन, लेवंत, सोमालिया, काश्मीर आणि अन्य इस्लामिक प्रदेशही शत्रुंच्या तावडीतून सोडवावा, जगभरामध्ये मुस्लिम कैद्यांना स्वातंत्र्य मिळू दे, असा उल्लेख या अभिनंदनाच्या संदेशात म्हटलं आहे.

आम्ही तालिबानची स्तुती करतो ज्याने शक्तीशाली अमेरिकेला लाजवलं आहे. अमेरिकेच्या पाठीचा कणा मोडला आहे. काश्मीर आणि इतर कथित इस्लामिक प्रदेशांना इस्लामांच्या विरोधातील शत्रूंच्या तावडीतून सुटका करा. त्यामुळे आता पूढचं लक्ष्य काश्मीर मुक्त ठेवा, असं आवाहन अल कायद्याने तालिबानलं केलं आहे.

दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूल काबीज केलं आहे. तेव्हा पासून देशातील विश्लेषक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. येणाऱ्या काळात तालिबानचा हा विजय दक्षिण आशियातील दहशतवादी गटासाठी आत्मविश्वास ठरू शकतो.

थोडक्यात बातम्या-

“काॅंग्रेसच्या मनात मोठ मोठ्या संकल्पना पण…”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या घरातील ‘या’ सदस्याचं अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

तालिबान्यांच्या मनात काय!! अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या ‘या’ महत्त्वाच्या सेेवाही केल्या बंद

“भारताने 20 वर्ष शत्रूला मदत केली त्यामुळे…”; अडकलेल्या भारतीयांबाबत तालिबानचं मोठं वक्तव्य!

“राज्याच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More