बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णाला घेऊन जाताना तो ऊसाचा रस प्यायला थांबला, पाहा धक्कादायक व्हिडीओ

भोपाळ | देशभरात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होत नाही. असं असताना आरोग्य कर्मचाऱ्यांचे अनेक गैरजबाबदारपणाचे वर्तन पाहायला मिळत आहे, अशीच एक घटना मध्ये प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात घडली आहे.

मध्ये प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एक कर्मचारी कोरोना रुग्णाला घेऊन जात असताना, अचानक गाडी थांबवून खाली उतरला आणि उसाचा रस पिण्यासाठी थांबल्याचे दिसून आले. या बेजबाबदारपणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही आरोग्य कर्मचारी कोरोना संक्रमित रुग्णांला रुग्णवाहिकेतून घेऊन जात होते. अशातच ते एका ऊसाच्या रसाच्या दुकानाजवळ थांबले आणि रस पिताना दिसले.

आरोग्य कर्मचारी पीपीई कीट घालून उभा होता. तिथे असलेल्या एका व्यक्तीने या सर्व प्रकारचा व्हिडीओ काढला असून सोशल हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावेळी तुम्ही कोरोना रुग्णाला घेऊन जात आहात आणि मास्कही लावलेला नाही. असं त्या व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने म्हटले तेव्हा आरोग्य कर्मचारी म्हणाला, आम्हाला कोरोना नाही त्या रुग्णाला कोरोना आहे. आता आम्हाला रस पिऊ द्या.

दरम्यान, कॅमेरा चालू असल्याचे लक्षात येताच त्या आरोग्य कर्मचाऱ्याने मास्क लावला. असे या संपूर्ण व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. देशावर कोरोनासारखे भयंकर संकट असताना आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

थोडक्यात बातम्या – 

धमाकेदार ऑफर! ‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

“मी गौतम गंभीरला माझा आदर्श मानतो”; ‘या’ स्टार खेळाडूनं सांगितलं गुपित

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा”

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही; प्रशासनाची धक्कादायक कबुली

लस उत्सवावरून राहूल गांधींचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; केलं ‘हे’ आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More