बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीस बोलत असताना भर अधिवेशनात गिरीश महाजनांना लागली डुलकी अन्…, पाहा व्हिडीओ

मुंबई | राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून हे अधिवेशन वादळी ठरल्याचं पहायला मिळत आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरु आहेत. विधानसभेत विरोधक विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता विधानसभेतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बीडमध्ये गोळीबाराचा थरार झालेल्या मुद्द्यावर बोलत आहेत तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांना झोप लागल्याचं दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फडणवीस या प्रकरणावरुन सरकारवर हल्लाबोल करत होते तर दुसरीकडे त्यांच्या मागील बाकावर बसलेल्या गिरीश महाजन यांचा डोळा लागला. एकदा त्यांनी डुलकीही मारली. नंतर आशिष शेलार यांनी त्यांना कोपरखळी मारत जागं केलं.

दरम्यान, आशिष शेलारांनी कोपरखळी मारताच गिरीश महाजन जागे झाले आणि फडणवीसांच्या वक्तव्याचं समर्थन करु लागले. या सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

“शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करीत राहू”

कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी कोविड टास्क फोर्सचा गंभीर इशारा, म्हणाले…

संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद, नेमका कोणता गौप्यस्फोट करणार?

बायकोसाठी कायपण! …म्हणून युद्धाच्या संकटात भारतीयाचा मायदेशी परतण्यास नकार

“हे सरकार बेवड्यांसाठी पॉलिसी करू शकतं, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More