Top News पुणे महाराष्ट्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे शिरुरमध्ये थांबले असताना चौकशी दरम्यान आला ‘हा’ प्रकार समोर

पुणे | कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतं आहे. नगरहून मुंबईकडे जात असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे शिरुरमध्ये थांबले असता चौकशी दरम्यान ‘महात्मा फुले जनआरोग्य’ ही योजना शिरुर तालुक्यात सुरु नसल्याची बाब समोर आली.

राजेश टोपे नगरहून मुंबईकडे जात असताना मध्येच अचानक महत्वाची व्हिडीओ कॉन्फरन्स सुरु झाल्याने राजेश टोपे यांनी शिरुरच्या तहसीलदार कार्यालयात थांबून कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. कॉन्फरन्स संपल्यानंतर गरीबांच्या मोफत उपचारासाठी राबवली जाणारी महात्मा फुले जनआरोग्य योजना कुठल्या रुग्णालयात चालू आहे अशी विचारणा तहसीलदार लैला शेख यांना केली.

तहसीलदार लैला शेख यांनी शिरुर तालुक्यात एकाही रुग्णालयात किंवा हॉस्पिटलमध्ये ‘महात्मा फुले जनआरोग्य’ ही योजना राबवली जात नाही असं सांगितलं. त्यांच्या या उत्तरावर जिल्हाधिकारी राजेश टोपे यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

दरम्यान, केवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटललाच नाही तर पन्नास, 25 आणि अगदी दहा-वीस बेड असणाऱ्या छोट्या रुग्णालयांनी मागणी केली तरीही त्या रुग्णालयात ‘महात्मा फुले जनआरोग्य’ ही योजना सुरु करु, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जनतेच्या पैशातून कंगणाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

पुण्याजवळील ‘या’ भागात होणार उद्यापासून लॉकडाऊन

“आज बाळासाहेब असते तर ही घटना घडलीच नसती”

उदयनराजेंनी पहिल्यांदाच मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत दिला हा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या