Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

आई-वडिल घरात नसताना पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत नराधमाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य!

Photo Credit- Pixabay

पुणे | राज्यात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच पुण्यातील विमाननगरमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणासंदर्भात विमाननगर पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. आरोपीचं नाव दिलीपकुमार गोस्वामी असून तो 20 वर्षांचा आहे. दिलीपकुमार विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करत आहे. पिडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत लेबर कॅम्पमध्ये राहते. तिचे आई-वडिल दोन्हीही नोकरी करताता.

एक दिवस आई-वडिल कामाला गेल्यावर घरात एकटी असलेल्या चिमुरडीला आरोपीनं घेरलं. दुपारी दोनच्या सुमारास आरोपी दिलीपकुमारने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं आणि तो काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पिडित चिमुरडीवर सध्या पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात येताच सर्वात मोठी घोषणा

येतेय मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा… सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत

विजय मल्ल्याचा बंगला खरेदी करणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्याला ईडीनं केली अटक

बेफिकिरी नडणार! डिसेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत एवढी वाढ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या