बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झाला असतानाही रोहित सरदाना करत होते ‘ही’ महत्त्वाची मदत, शेवटचे तीन ट्विट चर्चेत!

नवी दिल्ली |  प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दु:खद निधन झालं आहे. आज तक या वृत्तवाहिनीमध्ये वृत्त निवेदनाचं काम करत होते. कोरोनाची लागण झाल्यावर उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचं निधन झालं. रोहित सरदाना यांच्या मृत्युने देश सुन्न झाला असून मीडिया विश्वास शोककळा पसरली आहे.

रोहित सरदाना यांच्यावर उपचार चालु होते तेव्हाही इतरांची काळजी करत होेेते आणि मदत करत होते. कारण त्यांचे शेवटचे जे तीन ट्विट आहेत त्यावरून तरी हेच लक्षात येतं. कोरोनाची लागण झाल्यावर रोहित सरदाना हे दिल्लीतूल मेट्रो रूग्णालयात उपचार घेत होते. एकीकडे कोरोनाशी झुंज देत होेते तर आपल्या परीने लोकांची मदतही करत होते.

काल म्हणजेच 29 एप्रिलला सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांनी करुणा श्रीवास्तव नामक 39 वर्षीय महिलेला तातडीने 6 रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता असल्याचं ट्विट केलं होतं. त्याआधी त्यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवरील एक बातमीही ट्वीट केली होती. नोएडामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना 25 किमी अंतर नेण्यासाठी अँम्ब्युलन्सने 42 हजार रुपये घेतल्याचं ते वृत्त होतं.

दरम्यान, 28 एप्रिलला कोणाला प्लाझ्मा, तर कोणाला रक्ताची मागणी करणारे ट्विट सरदाना करत होते. कोरोना उपचारानंतर बऱ्या होणाऱ्या किमान एक चतुर्थांश व्यक्तींनी प्लाझ्मा डोनेट केला, तरी अनेक जीव वाचतील, असं आवाहन रोहित सरदाना यांनी केलं होतं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन

“कोरोना तर संपला” असं म्हणणाऱ्या भाजप आमदाराचं कोरोनाने निधन

‘कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा’; मुंबईतील 102 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘या’ लोकांना कोरोनाच्या दोन डोसची गरज पडणार नाही; संशोधक म्हणतात… 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More