नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात. नागपूर (Nagpur) येथे डाॅ गिरीश गांधी पुरस्कारासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होत. यावेळी ते बोलत होते. नितीन गडकरी बोलत असताना त्यांनी राजकारणाचा अर्थ याबद्दल मार्मिक भाष्य केलं
राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेच आहे. राजकारण हे समाजकारण, विकासकारण की सत्ताकारण यापैकी काय आहे? याबद्दल विचार केला पाहिजे. महात्मा गांधीच्या काळात राजकारण होतं. ते राजकारण राष्ट्रकारण, विकासकारण (Development cause),समाजकारण होतं. आताचं राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. यामुळेच अनेकदा मला राजकारण कधी सोडतोय असं झालं आहे, असं मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं आहे.
विचारापासून, थोर व्यक्तीच्या आर्दशापासून काही प्रेरणा मिळत असतात. त्या थोर व्यक्तीची जी विचारसरणी पुढे नेली पाहिजे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. तो माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे आहे. माणसाच्या कतृत्वाचा आणि निवडून येण्याचा काही संबध नाही. वेगवगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. राजकारणात(Politics) केव्हा काय होईल सांगता येत नाही असं ते म्हणाले.
राजकारणात असताना कला, क्रिडा, सांस्कृतिक या क्षेत्रात काम केलं पाहिजे. स्व:ता पुढाकार घेतला पाहिजे. यावेळी राजकारणाचा खरा अर्थ सांगणाऱ्या एका संस्कृत श्लोकाचंही त्यांनी उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी त्यांचा वृक्षरोपण कामाचा उल्लेख केला. तसेच यावेळी गिरीश गांधीच्या(Girish Gandhi) कामाचा उल्लेख केला.
थोडक्यात बातम्या
“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”
“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”
शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद
‘संजय राऊतांनी हलकटासारखं सांगितलं इथून जा, तेव्हाच ठरवलं…’, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.