बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाकिस्तानात 58 रूपये लीटर पेट्रोल असताना भारतात 106 रूपये का ?”

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं होतं. यामुळे सर्वसामान्य माणसांला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या भावात देखील वाढ व्हायला सुरूवात झाली होती. पेट्रोल-डिझेलचे भाव अलिकडे गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या माहागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता काँग्रेसने या भाववाढीवर आक्रमक भुमिका घेेतली आहे.

पेट्रोल- डिझेल, घरगुती गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाईविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं आहे. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेशात पेट्रोल प्रति लीटर 58 रुपये तर नेपाळमध्ये 56 रुपये लीटर आहे. मग भारतात पेट्रोल 106 रुपये लीटर का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. सामान्य माणुस केंद्र सरकारच्या जुलमाला कंटाळली आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली आहे.

काँग्रेसच्या काळात पेट्रोल 68 रूपये लीटर असताना स्वतःची गाडी जाळण्याची भाषा करणारे अमिताभ बच्चन कुठे आहेत ?. जनतेला स्वतःची गाडी विकून सायकल वापरण्याचा सल्ला देणारे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांना सध्याची इंधन दरवाढ दिसत नाही का?, असा सवाल देखील त्यांनी कलाकारांना विचारला आहे. तर पेट्रोलच्या किंमती 106 रूपये लीटरवर गेलं असताना कलाकार मुग गिळून गप्प का? असा सवाल देखील भाई जगतापांनी विचारला.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्राला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरही खूप कर आहे. इंधनावरील कर कमी केल्यास किमती खाली येऊ शकतात. तसेच इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलच्या किंमती 105 रूपये लीटरवर पोहचल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसेंनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स!

‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणं शक्य’; शक्तिकांत दास यांनी केंद्राला दिला हा सल्ला

“कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

“चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्यात, किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार” 

‘माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा’; नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी केल्या ‘या’ सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More