बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खेळत-खेळत चिमुकला आला रस्त्यावर, भरधाव वेगात मागून गाडी आली अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | अलीकडे वेगाने गाडी चालवण्याचं वेड असल्याने अनेक अपघात होतात. अशात अनेक अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाचप्रकारे सध्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा चिमुकला खेळत असताना अचानक रस्त्याच्यामध्ये आला तेवढ्यातच मागून वेगाने एक कार देखील आली.

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र संबंधित ठिकाणी प्रचंड पाऊस चालू असल्याने रस्त्यावर गाड्या सोडून दुसरं कोणी दिसत नाही. अशातच एक मुलगा रस्त्याच्या कडेला थांबलेला दिसतो. त्यानंतर संबंधित मुलगा रस्ता ओलंडण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान, मागून एक गाडी वेगाने येते.

वेगाने येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने त्याच्या कुशलतेचा वापर करुन त्या मुलाचा अपघात होता होता वाचवला. यावेळी मुलगा रस्त्यात पडला. मात्र लगेच उठून तो देखील धावत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन थांबला. विशेष बाब म्हणजे हे सगळं झाल्यानंतर गाडीत असलेले लोक आणि कार चालवणारा घाबरुन पळून गेले नाही.

दरम्यान, मुलाला वाचवण्यासाठी गाडी क्षणात साईडला घेऊन पुढे नेल्यानंतर तिच गाडी पुन्हा माघारी आली. तसेच गाडी मधल्या लोकांनी आणि ड्रायव्हरने खाली उतरुन मुलाला न ओरडता त्याला जवळ घेऊन आधी त्याची भिती घालवली आणि नंतर तो ठिक आहे का? याची पाहणी केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत रेकाॅर्ड झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!

भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास

“मोदीजींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागलेत”

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; वाचा काय आहेत नियम

पुणे ग्रामीणमध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव; नवे बाधित रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More