रंगपंचमी साजरी करताना ‘अशी’ घ्या काळजी

मुंबई | रंगपंचमीसारखी मज्जा दुसरी कशातच नाही. त्यामध्ये सुद्धा रंगपंचमी साजरी करायला अजिबातच आवडत नाही अशी खूप कमी मंडळी या पृथ्वीतलावर आहे. शक्यतो रंगाणे माखणे आणि त्याचसोबत वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करणं हे सर्वांचं अवडतं.

धुळवड, रंगपंचमी करताना त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. हल्ली बाजारात नैसर्गिक रंगाचा वापर न करता रसायनिक रंगाचा जास्त वापर केला जातो. त्यामुळे असे रंग आरोग्याला हणिकारक सुद्धा ठरु शकतात.

रंग खेळताना ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी सर्वात आधी काळजी घेणं गरजेचं आहे. त्या मागचं कारण म्हणजे रंगामध्ये रसायनिकचा वापर केला जातोे. त्यामुळे अशा लोकांचे आरोग्य बिघडू शकतं. अनेक प्रकारची रसायने आहेत, जी श्वसन मार्गामध्ये जाऊन संसर्ग वाढवू शकतात. यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो. 

त्याबरोबरच काही लोेकांना शरीरावर बुरशीजन्य संसर्ग होतो. त्यामुळे या लोकांनी सुद्धा रंग खेळताना काळजी घेतली पाहीजे. कारण रासायनिक रंगांमुळे ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, लाल पुरळ उठणे, जळजळ होणे अशी लक्षणे आढळू शकतात.

थोडक्यात बातम्या-

‘ट्रेलर नाही मी डायरेक्ट पिक्चर दाखवणार’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवून फिरावं लागेल”

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, असा महाराष्ट्र कधीही नव्हता- राज ठाकरे

उद्धव ठाकरेंना पुन्हा झटका?; सर्वात जवळची व्यक्ती शिंदेंच्या संपर्कात?

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील 2 कोटी 38 लाख रुपये, अजित पवार म्हणाले…