बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस घेताना पोरीची नाटकं पाहून डॉक्टर जाम भडकले, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

नवी दिल्ली | भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. 1 मेपासून देशातील राज्यांमध्ये लसीकरण चालू झालं आहे. इंजेक्शनद्वारे लस दिली जाते. मात्र काहींना अजूनही इंजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे लस घेताना काहीजण खूप घाबरलेले दिसतात किंवा डॉक्टरांना त्रास देतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशाच प्रकारे एका मुलीने लस घेताना इतकी नाटकं केली आहेत की डॉक्टर तिच्यावर भडकलेले व्हिडीओमध्ये दिसत आहे.

ती मुलगी लस घ्यायच्या आधीपासूनच वारंवार मम्मी, मम्मी ओरडत होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक मुलगी खुर्चीवर बसलेली दिसते.

डॉक्टर तिला बसायला सांगतात मात्र ती फक्त ओरडत असते. डॉक्टर तिला बोलतात की जा मग तुला लस नाही देत, त्यानंतर ती त्यांना सॉरी बोलते. अखेर नर्सनं या मुलीला पकडल्यानंतर डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हाही ती मम्मी बोल ना, डॉक्टर बोलतात मम्मी काही नाही बोलणार मात्र ती मुलगी बोलते की, मम्मी बोल ना काहीतरी, अशात डॉक्टर लस देऊन टाकतात.

दरम्यान, आधीच लसीकरणासाठी खूपच रांग असते. त्यात या मुलीची नाटकं पाहून डॉक्टर तिच्या नाटकांना जाम भडकले असावेत.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाकाळात यशराज फिल्म्सचा मदतीचा हात, ‘या’ 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय

“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”

कोरोनाचे उपचार घेताना ‘हे’ औषध घेतलं तर झपाट्याने पसरेल कोरोना; एम्स संचालकांचा इशारा

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

आनंदाची बातमी! भारतातील ‘ही’ लस कोरोनावर प्रभावी; ICMR च्या संशोधनातून समोर आले निष्कर्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More