बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्कसमधील खेळ सुरू असताना अचानक सिंहाने ट्रेनरवरच केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली |  आपल्याला माहित असेल की, सर्कसमध्ये अनेक प्रकारचे खेळ सुरू असतात. सर्कसमधील प्राण्यांना पाहून ते प्राणी अंगावर येतात की काय या भितीने आपण त्यांना पाहून अनेकदा घाबरतो. परंतू सर्कशीमधील प्राणी कोणावर हल्ला करत नाहीत. कारण त्यांना तसं प्रशिक्षण दिलं गेलेलं असतं. 

अशातच एका सर्कसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. त्या सर्कसमध्ये दोन सिंहांची कुस्ती सुरू असताना, त्यातील एक सिंह अचानक त्या ठिकाणी असलेल्या ट्रेनरवर हल्ला करतो. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सर्कसमधला आहे. या सर्कसमध्ये ज्याप्रमाणे आखाड्याचं रिंगण असतं त्याच्या सारखंच रिंगण या सर्कशीमध्ये असल्याचं दिसून येतं आहे. त्या रिंगणामध्ये दोन सिंह एकमेकांबरोबर कुस्ती करत आहेत. त्यातील एका सिंहाने काही मिनिटांतच दुसऱ्या सिंहाला मातीत लोळवलं असल्याचं दिसून येत आहे. हे सगळं सुरू असताना, त्या रिंगणामध्ये त्यांचा ट्रेनर हातात एक काठी घेऊन येतो. परंतू पिसाळलेला सिंह आपले प्रशिक्षण विसरून, त्या ट्रेनरवरच झडप घालतो.

हे सगळं अचानक घडल्यामुळे ट्रेनर खूप गोँधळून गेला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या सिंहाने त्या ट्रेनरचा पाय आपल्या जबड्यात धरला असून, त्याला ओढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी ट्रेनर आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या हातात असलेली काठी त्याला मारत आहेत. जेणेकरून तो सिंह आपला पाय सोडेल. ट्रेनरची मदत करण्यासाठी रिंगणाबाहेर असलेले दोन ट्रेनरही त्यांची मदत करण्यासाठी येतात. सिंह थोडा शांत झाल्यानंतर स्वत:हुनच त्या ट्रेनरचा धरलेला पाय सोडतो आणि तिथून निघून जातो.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षातच होणार मृत्यू?; जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागचं सत्य

‘नारायण राणेंना कावीळ झाली, पनवती म्हणून भाजपने त्यांना…’; राणेंच्या टीकेला शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

‘मैनू काला चष्मा जचता है’ म्हणत नवरीची लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हायरल व्हिडीओ

पत्नीच्या फोटोवरुन नवा वाद; इरफान म्हणतो, मी तिचा मालक नाही!

होम आयसोलेशन बंद या राज्य सरकारच्या निर्णयावर पुणे महापालिकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More