बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पतीला गर्लफ्रेंडसोबत असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं; पत्नीनं भररस्त्यात दोघांना…

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आसनसोलमध्ये बर्नपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत मज्जा मारणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर पत्नीने पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धु धू धुलाई केली.

हातात हेल्मेट घेऊन पत्नीनं दोघांना धू धू धुतले. जमलेल्यांनी याचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतीची गर्लफ्रेंड महिलेला भररस्त्यात पत्नीने मारहाण केली.

पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला हेल्मेटने मारहाण केली. नंतर दोघांना आसनसोल दक्षिण पोलीस चौकीत नेलं. पोलिसांनी पती आणि गर्लफ्रेंडला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बर्नपूर येथील रहिवासी असलेला मोहनलाल हा आसनसोल बर्नपूर रोडवरील पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत थांबला होता. पत्नीने मोहनलालचा मागोवा घेत तिने हॉटेलच्या खोलीत मोहनलालला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला रंगेहाथ पकडलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

अण्णा भाऊ साठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये मला काहीही फरक दिसत नाही- मोहन भागवत

कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले…

अमोल कोल्हे म्हणतात, “…मग त्यांना जातीवादाची कावीळ झालीये, असं म्हणावं लागेल”

“…तर विरोधकांनी याची काळजी घ्यावी”, उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना डिवचलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More