बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron मुळे चिंता वाढली असताना WHO ने भारताला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

नवी दिल्ली | कोरोनानंतर हळूहळू त्याच्या नवनवीन व्हेरिएंटनं थैमान घालायला सुरुवात केली आहे. आता ओमिक्राॅन (Omicron) नावाच्या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं असून देशभरात त्याचा संसर्ग होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

ओमिक्राॅनचा (Omicron) वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागाचंही टेंशन वाढलं आहे. ओमिक्राॅननं धोका अधिक वाढला असून आता बूस्टर डोस द्यावा असं म्हटलं जात आहे. अशातच WHO ने भारताला दिला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

चिंता वाढवली असताना लसीकरण न केलेल्या लोकसंख्येचं प्रथम लसीकरण करण्याऐवजी बूस्टर डोसची (Booster Dose) घाई करणे योग्य नाही, असं डाॅ. ऑफ्रिन म्हटलं. संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करून संसर्गाचा प्रसार कमी करण्याचा भारताचा दृष्टीकोन योग्य आहे, असंही डाॅ. ऑफ्रिन म्हटलं.

दरम्यान, ओमिक्राॅनचा (Omicron) वाढता संसर्ग पाहता लवकरच देशात कोरोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ओमिक्राॅन व्हेरिएंटची ही लाट फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या  – 

‘…तरच कर्मचाऱ्यांना पगार वाढ मिळणार’; अनिल परब यांचा गंभीर इशारा

पोस्टाची भन्नाट योजना; बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा

चिंताजनक! Omicron मुळे ‘या’ महिन्यात येणार देशात तिसरी लाट?

पुण्याला हादरवणाऱ्या गोल्डनमॅन समीर मसूर हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई!

‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; नीना गुप्तांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More