बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात चांगलाच रोष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल डिझेलच्या दराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्या सर्वांचंच लक्ष पेट्रोल डिझेलचे दर कमी केव्हा होणार याकडे लागलं असताना हे दर सध्या तरी कमी होणार नसल्याचे संकेत हरदीप सिंह पुरी यांनी दिले आहेत. शनिवारी दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी हरदीप सिंह पुरी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे.

कार्यक्रमात बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, कोरोना महामारीचं संकट येण्यापूर्वीच्या तुलनेत आज पेट्रोल आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशात पेट्रोलचा वापर 10-15 टक्के तर डिझेलचा वापर 6-10 टक्क्यांनी वाढला आहे. मी किंमतीवर जाणार नाही. परंतु सध्या आम्ही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आज देखील इंधनांच्या दरात वाढ केली आहे. या दर वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांची वाढ पाहायला मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या –

…यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे- संजय राऊत

रेल्वेच्या ‘या’ विभागाने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले…

‘मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले असतील पण मी…’; पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं वर्ल्ड बँकेनं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More