बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किचनमध्ये काम करताना अचानक महिलेच्या केसांनी घेतला पेट अन्…; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करुन सोडणारे असतात. सध्या असाच एक आपल्याला थक्क करुन सोडणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका महिला किचनमध्ये काम करताना दिसत आहे. काम करताना महिलेच्या केसांना आग लागलेली दिसत आहे. मात्र, केसांना आग लागलेली असताना देखील बराच वेळ या महिलेला त्याची कल्पना देखील नसते. ही महिला आपल्याच कामात व्यस्त असते.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला किचनमध्ये काम करत आहे. महिलेने गॅसवर काहितरी शिजण्यासाठी ठेवलं आहे. किचनच्या ट्रॉलीमधून कोणतीतरी वस्तू काढण्यासाठी ही महिला खाली वाकली असताना अचानक तिचे केस आगीच्या संपर्कात येतात आणि पेट घेतात. हळूहळू काम करत या महिलेच्या डोक्यावरील सर्व केस पेट घेऊ लागतात. परंतु या महिलेला याची भनक देखील लागत नाही.

दरम्यान, आपल्या केसांना आग लागल्याचं या महिलेच्या बऱ्याच वेळाने लक्षात येतं. यानंतर ही महिला आपल्या हातांनी केसांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते आणि किचनमधून बाहेर पळत सुटते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलं नाही. हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या –

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

“आमचा विश्वासघात झालाय, ‘ते’ मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More