बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. आगमी पावसाळी अधिवेशनासंबंधित हा व्हिप आहे.

पाच आणि सहा जुलै रोजी राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना या अधिवेशनास उपस्थित राहायचे आहे, असा व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी जारी केला आहे.

सध्या राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं रद्द केलेलं आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना रूग्णांची वाढती संख्या यांसारख्या अनेक मुद्यांमुळे हे पावसाळी अधिवेशन महत्वाचं ठरणार आहे. यामुळे दक्षता म्हणून शिवसेनेनं आमदारांना व्हीप बजावला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, व्हिपचा साधासोपा अर्थ म्हणजे पक्षशिस्तीचं पालन करणे होय. व्हीपची संकल्पना ब्रिटिश काळातील आहे.  प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप असतो. आपल्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम या व्हीपने करायचे असते.

थोडक्यात बातम्या – 

“बार, पब, डिस्को चालतात मग गणेशोत्सव का नाही?”

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही एकाही कोरोना रूग्णाच मृत्यु नाही

“पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’”

“भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत”

…..म्हणून कम्प्युटर पदवीधरांना आली काॅंग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More