बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

होळीच्या दिवशी पांढऱ्या कपड्यांना आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या या मागचं खरं कारण

मुंबई | देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा सण (Holi Festival) साजरा केला जातो. देशातच नाही तर विदेशातही होळी साजरी केली जाते. आपल्या देशात रंगाच्या या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या सणाला रंगांप्रमाणे पांढऱ्या कपड्यांना (White Clothes) देखील विशेष महत्त्व आहे.

आजच्या काळात एक फॅशन म्हणून बरेच लोक होळीदिवशी पांढरे कपडे परिधान करतात. मात्र, पूर्वीच्या काळापासूनच होळीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान करण्याला विशेष महत्त्व राहिलं आहे. होळीच्या दिवशी पांढरे कपडे घातले तर सकारात्मकता येते, अशी अनेकांची धारणा आहे.

होळीचा सण उन्हाळा वाढत असताना येतो आणि उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं चांगलं मानलं जातं. कारण वाढत्या उन्हात पांढरा रंग शरीराला थंडावा देतो. तसेच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून होलिका दहन करणे देखील शुभ मानले जाते.

दरम्यान, होळीच्या दिवशी लोक राग रूसवे विसरून होळीच्या रंगात रंगून जातात. पांढरा रंग कोणत्याही रंगात मिसळून जातो. पांढऱ्या कपड्यावर जो रंग टाकू त्या रंगाचा तो होऊन जातो. या अशा अनेक कारणांमुळे होळीच्या सणाला पांढरे कपडे घालण्याची प्रथा पडली आहे.

थोडक्यात बातम्या-

रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

पेमेंट वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यानं लढवली अनोखी शक्कल, ऑफिसमध्येच केलं ‘हे’ काम

‘माझ्यासारखे सेक्सी कपडे घालतात ते…’; नीना गुप्तांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More