आरोग्य कोरोना विदेश

कोरोना अलर्ट… जागतिक स्तरावर कोरोनाचा मृत्यूदर तब्बल ‘इतक्या’ पटीनं वाढला!

जिनिव्हा | कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील कोरोना बाधीतांचा आकडा 5 पटीनं वाढला आहे. यासोबत कोरोनामुळे मृत्यूदरातही 3 पटीनं वाढ झाल्याची धक्कादायक माहिती WHO कडून देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डाॅ. ट्रेडोस एडनाॅम यांच्या मते, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांचा आकडा आता 17.5 मिलीयनच्या घरात जाऊन पोहचला आहे. मृत्यूदरातही भयावह पद्धतीनं वाढ झाली असून 6 लाख 80 हजार नागरिकांसाठी कोरोना व्हायरस जीवघेणा ठरला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनावर प्रभावी ठरलेल्या जगभरातील अनेक लसी चिकित्सा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचल्या आहेत, अशी माहिती देखील ट्रेडोस यांनी यावेळी दिली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. आरोग्य संघटनेच्या कमिटीकडून या विषाणूबाबत अद्ययावत संशोधन करण्यात येत असून मूल्यांकनाबाबतही बैठका घेण्यात येत असल्याची माहिती आहे. कोरोनाला मात देण्यासाठी सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून उपाययोजना करणं आता गरजेचं बनलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांना दिलासा! एकाच दिवशी मिळाल्या ‘या’ दोन बड्या गुडन्यूज…

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे- अनिल देशमुख

महाराष्ट्र-बिहार संघर्षादरम्यान पहिल्यांदाच मुंबई पोलिस आयुक्त मीडियासमोर, म्हणाले…

जगातील ‘ही’ मोठी कंपनी TikTok खरेदी करण्याच्या तयारीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या