बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोन है ये लोग, कहाॅं से आते है ये लोग’; आनंद महिंद्रांचा संतप्त सवाल

नवी दिल्ली | जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली घटना दुसऱ्या कोपऱ्यात पोहचायला अवघे काही सेकंद लागत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आज सोशल मीडियाची क्रांती झाली आहे. सोशल मीडियावरील(Social media) आलेले मॅसेज, व्हिडीओ हे तपासून पाहाणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मोठा त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा त्रास प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांना सध्या झाला आहे.

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. देशात तसेच देशाबाहेरील घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी आनंद महिंद्रा यांच्या माध्यमातून देशाला कळतात. आता मात्र आनंद महिंद्रा यांच्या नावानं खोटा संदेश विविध सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे आणि स्वत: आनंद महिंद्रांनीच या गोष्टीचा ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे.

मी कधीच न बोललेल्या गोष्टी व्हायरल करण्यात आल्याचं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. हे स्पष्ट करताना त्यांनी ‘कोन है ये लोग कहाॅंसे आते है ये लोग’ या आशयाचा अर्शद वारसींचा एक मीम ट्विट केला आहे. आनंद महिंद्रांनी हे स्पष्ट केलं आहे की माझ्या नावानं जे काही संदेश सोशल मीडियावर पसरत आहेत ते खोटे आहेत. परिणामी पहिल्यांदाच आनंद महिंद्रा ट्विटरवर संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करत आसताना आलेला संदेश आणि इतर माहिती तपासून पुढे पाठवणं गरजेचं आहे. अशा व्हायरल गोष्टींपासून अनेकदा विविध प्रकारच्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

थोडक्यात बातम्या 

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

शरद पवार-अनिल परब बैठकीत नेमकं काय झालं; आली ‘ही’ माहिती समोर

“भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात, आपण ते करू शकत नाही”

पार्थ पवार पुन्हा मावळातून निवडणूक लढवणार का?; ट्विटमुळे चर्चांना उधाण

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More