सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा? शरद पवारांचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली | राज्यात चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकारने उचलबांगडी केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. सचिन वाझेंना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रूपये वसुल करायला सांगितलं असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. तर या प्रकरणात सचिन वाझे यांचं निलंबन झालं आहे. तर याच्या अगोदरही वाझेंचं निलंबन झालं होतं मात्र त्यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय कोणाचा होता याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माहिती दिली आहे.
सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांचाच असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेलं नसल्याचं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आलं. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, मित्राला वाचवण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, पाहा व्हिडिओ
अनिल देशमुखांवर झालेल्या गंभीर आरोपांवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन, म्हणतात…
‘ये तो सोची समझी चाल’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची भाजपवर टीका
कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा?- चित्रा वाघ
‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.